भीषण आगीत आॅईल इंडस्ट्री खाक!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : जुन्या बायपास मार्गावर असलेल्या एमआय डीसीतील रामा आॅईल इंडस्ट्रीला रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्यामुळे ही इंडस्ट्री पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. हनुमानसेठ अग्रवाल यांच्या मालकीची ही आॅईल इंडस्ट्री आहे. आग लागल्याचे लक्षात येताच कार्यरत कामगार पटकन बाहेर पडले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे त्यांच्याही लक्षात आले नाही. अग्रवाल यांनी घटनेची माहिती अग्निशमन दल, एमआयडीसी असो.चे अध्यक्ष किरण पातुरकर व पदाधिकाºयांना दिली. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मदतीने संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली.

काही वेळातच आगिने विक्राळ रूप धारण केल्यामुळे शक्य तेवढे पाण्याचे बंब घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले. सदर इंडस्ट्रीमध्ये सरकीपासून आॅईल काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये सरकी आणि त्यापासून काढलेल्या आॅईलचा साठा बºयापैकी होता. हा सर्व साठा आगीच्या विळख्यात सापडल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. बराच दूर अंतरापर्यंत आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. घटनास्थळावर मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तेथे बंदोबस्त तैनात केला होता. जवळपास अग्निशमन दलाच्या ३० बंबांनी आग नियंत्रणात आणली. जिल्ह्याच्या अन्य स्थानावरून बंब बोलविण्यात आले. त्यांना तातडीने पाणी उपलब्ध व्हावे म्हणून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तोडण्यात आली होती.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *