तुमसर शहरात ‘हिट अ‍ॅण्ड रन’ चा थरार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील तुमसर शहरात आज दुपारच्या सुमारास हीट अँड रनचा थरार बघायला मिळाला. सुसाट वेगाने आलेल्या कार चालकाने रस्त्यावरून प्रवास करणाºया प्रवाशांनाधडक देत जखमी केले.भरधान कारने तीन जणांना उडविले असून यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेतील कार चालकांना परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात सिहोरा कडून भरधाव वेगाने जाणाºया एका कारने दुचाकीस्वारासह व एक मुलगी व अन्य एकाला धडक दिली आहे. त्यात दोघेजण जखमी झाले. जखमींमध्ये एका मुलीचा समावेश आहे. सदरचा अपघात तुमसर येथील बावनकर चौकाजवळ घडला. यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली होती. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेली कार ही विरुद्ध दिशेने भरधाव येत होती.

यावेळी दुचाकी चालक राधेश्याम मलेवार (वय ५०, रा. बहेवाडा) यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक देत उडविले. यानंतर बावनकर चौकाजवळ उभ्या असलेल्या वैष्णवी राजकुमार भिवगडे (वय १५, रा. तुमसर) या युवतीला देखील धडक दिली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. हा थरार सुरू असताना एकच धावपळ माजली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला थांबली. दरम्यान रविवार असल्याने शहरातील रस्त्यावर फारसी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दोघांना धडक दिल्यानंतर उपस्थित काही नागरिकांनी कार चालकाला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारसह कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *