भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : मुघल सम्राट औरंगजेब आणि त्यांच्या कबर वरून महाराष्ट्र राज्यातील राजकारण कमालीचे तापले (किंबहुना तापविण्यात येत ) आहे. भारतीय जनता पक्षासह हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाचे पदाधिकारी, नेते भडक प्रक्षोभक विधाने करीत आहे. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना करून ते देखील क्रूर शासक असल्याचे विधान करून आगीत तेल ओतले आहे. या वादंगाचे पडसाद सोमवार १७ मार्च रोजी गोंदिया जिल्ह्यात उमटले. सोमवारी गोंदिया शहरात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने जहाल आंदोलन करण्यात आले. सोमवारी, १७ मार्च रोजी दुपारी रणरणत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली. “छत्रपती संभाजी महाराज के सन्मान मे बजरंग दल मैदान मे” असे घोषवाक्य देत छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ खुलदाबाद (जिल्हा छत्रपती संभाजी नगर) येथील औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी बजरंग दल आणि विहिंपने यावेळी करण्यात आली.
औरंगजेबाची कबर न हटवल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देत कार सेवेची तयारी करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. सोमवारी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. तिथीप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भर दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. बजरंग दलाचे देवेश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.भारत माता की जय , छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, च्या घोषणानी जिल्हा कचेरी परिसर दुमदूमला.
आंदोलनात बजरंग दलाचे प्रांत संयोजक देवेश मिश्रा, प्रान्त सहमंत्री, नवीन जैन, प्रान्त संयोजक, मुकेश उपराडे, जिला सहमंत्री, महेंद्र देशमुख, जिला सत्संग प्रमुख, अंकित कुलकर्णी, जिला संयोजक, हार्दिक जिवानी, विठ्ठल कोठेवार, प्रमोद कोठारी, नगर अध्यक्ष, हरीश अग्रवाल, नगर मंत्री, दिलीप रक्से, नगर सहमंत्री, जितेंद्र राणा, दिलीप कुंगवानी, विशाल शुक्ला, अनिल सदन, भोला कोकाटे, भूमेश डहारे, ओमप्रकाश तिवारी, सागर परिहार, आशीष टेंभरे, कोमल रहांगडाले, भूपेंद्र श्रीवास, अनिल बिसेन, हितेश कोडवानी, बन्नी कनोजिया, शैलेन्द्र मिश्रा, संजय पटेल, अशोक हेमने, अजय यादव, अजय जैन, बबलू गभने, लवकेश मिश्रा, आशीष कटरे, पंकज मिश्रा, प्रदीप बिसेन, कोमल धोटे, नितिन जिंदल, रोहित श्रीभाद्रे, अजय अग्रवाल, सोनू गौतम, ओमप्रकाश तिवारी, समरित नशीने यांच्यासह विहिप, बजरंग दल, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलना नंतर विविध मागण्याचे मागण्यांचे निवेदन गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले .