भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आज दिनांक १७ मार्च सोमवार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शुक्रवारी येथील महाराजांच्या स्मारकाचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांच्या हस्ते जलाभिषेक व पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपस्थितांनी पुष्पर्पण केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेश भाऊ धुर्वे, शहर प्रमुख मनोज साकुरे, संजय कुंभलकर, महिला जिल्हाप्रमुख सविताताई तुरकर आशाताई गायधने, आशा गिरीपुंजे, गणेशपुरच्या सरपंच मेहेर ताई नितीन धकाते, कृष्णा ठवकर, संजय नागदेवे, योगेश पडोळे, उमेश लांजेवार, प्रकाश गोन्नाडे, बंटी मिश्रा आदी शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेकडून शिवजन्मोत्सव साजरा
