भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- सालेकसा तालुक्यातील खेडेपार येथे विषारी सापाच्या चाव्याने १० वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किंजल नागपुरे (१०) असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. मृतक चिमुकलीच्या कुटुंबाची शेती घराशेजारीच असल्याने चिमुकली आणि तिचा लहान भाऊ ही दोघेही अंगणात खेळत होते. दरम्यान मृतक किंजल ही शेतात उतरली असता, अचानक विषारी सापाने दंश केल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबतची माहिती तिने कुटुंबियांना दिल्यानंतर, लगेच सालेकसा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
विषारी सर्पदंशाने १० वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
