रवी धोतरे/ भंडारा पत्रिका लाखनी :- तालुक्यातील पोहरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुरम व मातीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर महसूल अधिकाºयांच्या आशीर्वादाने सुरू असून सपाटी करण्याच्या नावावर गौण खनिज तस्करांकडून शासनाच्या महसुलाला चुना लावत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. पोहरा येथील मेंढा रस्त्यावर उजव्या बाजूला पोहरा टोलीपासून १०० मीटर अंतरावर एका खाजगी शेतातून मुरूम व मातीची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असून महसूल अधिकाºयाकडून कमालीची गोपनीयता ठेवली जात असल्याने महसूल अधिकारी व तस्कर यांची मिलीभगत तर नाही ना? अशी परिसरात चर्चा आहे.
घरकुल, बांधकाम आणि इतर कामाकरिता मुरूम मातीची आवश्यकता असते त्यामुळे तस्कर महसूल अधिकाºयांना हाताशी धरून खुलेआम माती व मुरमाची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे शासनाचामहसूल मोठ्या प्रमाणात बुडत असून पोहरा मेंढा रस्त्याच्या बाजूला २ते ३ हजार ब्रास मुरूम व मातीचे उत्खनन करण्यात आले असल्याची माहिती असून महसूल अधिकाºयांचा आशीर्वाद असल्याने दिवसाढवळ्या अवैध वाहतूक जोमात सुरु आहे. शासनाकडून गौण खनिज वाहतूक व उत्खानानावर आळा घालण्यासाठी नवनवीन उपाययोजना आखल्या जात असल्या तरीही कुंपणच शेत खात असल्याने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक सुरूच असल्याचेचित्र तालुक्यात असून त्यामुळे पर्यावरणाचे तसेच नैसर्गिक संपत्तीचेविद्रुपीकरण होत आहे. अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी महसूल विभागामार्फत पथके निर्माण करण्यात आली असली तरीही हे भरारी पथके नाव सोनाबाई हाती कथलाचा वाटा या पार्श्वभूमीवर काम करीत असल्याची चर्चा आहे. सर्व पथके तेरी भी चूप या भूमिकेत वागत असल्याचे दिसून येत आहे. पोहरा -मेंढा रस्त्याच्या बाजूला पडलेला मोठा खड्डा हेच सांगून जात आहे.
महसूल अधिकारी हे धृतराष्ट्र च्या भूमिकेत असून त्यांना गौण खनिज चोरीवर आळा घालण्याएवजी बांबूचे वेध लागण्याने तस्करांना सुगीचे दिवसआले आहेत. जिल्हाधिकारी महोदय यांनी स्वत: त्या पोहरा मेंढा रस्त्याच्या बाजूला असलेल्या २-३ हजार ब्रास मुरमाची चौकशी केल्यास मोजणी करून सबंधितावर दंड आकारल्यास मोठ्या प्रमाणावर शासनास महसूल जमा होऊ शकतो. परंतु सपाटीकरण करण्याच्या नावावर आशीर्वाद देणाºयाा त्या अधिकाºयावर कारवाई कोण करणार? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून लाखनी तालुक्यात गौण अवैधरित्या वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून यावर अंकुश कोण घालणार? हे मात्र न समजणारे कोडे आहे तेव्हा मात्र जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाºया व तस्करांना मदत करणाºया अधिकाºयावर तातडीने कारवाई करावी अशी जनतेची मागणी होत आहे.