शेतकºयांनो धवल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करा – आ. बडोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण घटक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दुग्ध उत्पादन वाढविणे शेतकºयांसाठी आर्थीकदृष्ट्या गरजेचे आहे. शेतकºयांनी धान व ईतर पिकांसह भरपुर दुध देणाºया संकरीत गाई, म्हसींचे पालन करुन पशु आरोग्य व्यवस्थापन करुन शासनाचे विविध योजनांचा लाभ घेवुन धवल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी केले. ते जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती अजुर्नी मोरगावच्या वतीने तालुक्यातील निमगाव येथे १६ मार्च रोजी आयोजित तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यात उदघाटक म्हणुन बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते. पाहुणे म्हणून जिप सभापती डॉ. लक्ष्मण भगत, सभापती दिपा चंद्रिकापुरे, सभापती पौर्णिमा ढेंगे, माजी जिप उपाध्यक्ष यशवंत गणवीर, पंस सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, कविता कापगते, जिप सदस्य श्रीकांत घाटबांधे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जे.के. तीटमे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. पी. पटले, पंस सदस्य होमराज पुस्तोडे, सविता कोडापे, नुतनलाल सोनवाने, नाजुक कुंभरे, पुष्पलता दृगकर, कुंदा लोगडे, शालिनी डोंगरवार, भागेश्वरी सय्याम, शैलजा सोनवाणे, अमरचंद ठवरे, सरपंच वंदेश्वरी राऊत, उपसरपंच संदीप पुस्तोडे, सरपंच विलाश फुंडे, सरपंच सचिन डोंगरे, उपसरपंच सुखदेव मेंढे, उपसरपंच छगन पातोडे, उपसरपंच काशिनाथ कापसे आदी उपस्थित होते.

प्रसंगी प्रदर्शनीत सहभागी पशुपक्ष्यांची तज्ज्ञांकडून पहाणी करून उत्कृष्ठ पशपक्षींना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. उत्कुष्ठ शेतकºयांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. बचत गटांचे शेती व पशुसंबधी विविध स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप कापगते यांनी केलेत्र संचालन महेश राठोड यांनी तर आभार डी. के. लांजेवार यांनी मानले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *