भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ तिरोडा आगारात चालक पदावर असलेले देवरामजी कोवे ५८ वर्ष यांना नुकतेच सहाय्यक तिकीट निर- ीक्षक पदावर पदोन्नती मीळाली होती तसेच ते ३१ मार्च २०२५ ला सेवानिवृत्त होणार होते. मात्र १६ मार्च रोजी एका नातेवाईकाचे तेरवी करता गेले असता तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी तेथेच मुक्काम केला. रात्री झोपेत असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन कुठलेही उपचार मिळण्याआधी मृत्यू झाला.या घटनेमुळे तिरोडा राज्य परिवहन मंडळाचे सर्व कर्मचाºयांमध्ये दु:खाचे वातावरण पसरले असून त्यांचे मूळ गाव बोरगाव तालुका साकोली येथे त्यांचेवर १७ रोजी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
सहाय्यक तिकीट निरीक्षकाचा हृदय विकाराने मृत्यू
