बिबट्याने ६ शेळ्या केल्या फस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील सालेभाटा येथे बिबट्याने एका शेतकºयाच्या गोठ्यातील सहा शेळ्यां बिबट्याने फस्त केल्याने शेतकºयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.सदर घटना आज दि.१७ मार्च २०२५ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.प्यारलाल मोडकु रहांगडाले असे नुकसाग्रस्त शेतकºयाचे नाव आहे. सालेभाटा येथील शेतकरी हे शेळीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांच्या मालकीच्या सहा शेळ्या घराशेजारील गोठयामध्ये बांधुन ठेवल्या असता रात्रीदरम्यान बिबट्याने गोठयातील सर्व सहा शेळ्या फस्त केल्या.पहाटे सदर घटना उघडकीस येताच नागरीकांनी वनविभागाला याची माहिती दिली.

माहिती मिळताच लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. पी. यांच्या मार्गदर्शनात श्री. जे. एम. बघेले क्षेत्र सहाय्यक लाखनी, कु. टी. जी. गायधने बीटरक्षक लाखनी, श्री. लखवाल बीटरक्षक गडेगाव, श्री बोरकर बीटरक्षक रामपुरी, बीट मदतीस मयूर गायधने यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृत शेळ्यांची पाहणी करून पंचनामा केला. डाँ. देशमुख मॅडम पशु वैद्यकीय अधिकारी लाखनी व डॉ. कापगते पशुवैद्यकीय अधिकारी लाखोरी यांनीसुध्दा घटनास्थळी धाव घेत मृत शेळ्यांची पाहणी व चौकशी केली. घटनास्थळाची पाहणी करताना वनविभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सोबत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती खुमेश बोपचे सरपंच सालेभाटा, संजय बोपचे पोलीस पाटील सालेभाटा, श्री.भगत व गावातील नागरीक उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *