भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ मधील तुमसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाºया याचिकाकर्त्या म्हणून माजी आमदार चरण वाघमारे यांनी याचिका दाखल केलेली ही निवडणूक याचिका आहे, ज्यामध्ये प्रतिवादी क्रमांक १ श्री.राजू माणिकराव कारेमोरे यांचेवर लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२३ अन्वये भ्रष्टाचाराचा आरोपयाचिकेत इतर कारणांसह करण्यात आला आहे. प्रतिवादींना नोटीस पाठवीत, आठ आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी दिले. विशेष म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने याचिका दाखल करीत प्रकरण कोर्टात चालविण्यात येणार असल्याने तुमसर विधानसभा क्षेत्राचे भवितव्य आता माननीय न्यायालयाचे कोर्टात नक्कीच असेल. याचिका कर्त्याचे वतीने अॅड. चांदेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
८ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे नागपूर उच्च न्यायालयाचे आदेश
