भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, नागपुरातही औरंगजेबाची कबर हटविण्यावरून आंदोलन करण्यात आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब हा क्रूरकर्मा आणि धर्मद्वेषी शासक होता. त्याची कबर हटविण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाच्या नागपूर महानगराच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून केली. मात्र, मोर्चा निघून गेल्यानंतर, इतर धर्माच्या युवकांनी चौकात एकत्र येऊन घोषणा देण्यास सुरुवात केली आणि तणाव निर्माण झाला. दरम्यान जमावाने किमान ३० चारचाकींची तोडफोड करण्यात आली. काही आगीत भस्मसात झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेच्यावेळी सीसीटीव्ही फोडत दगडफेक करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी जमावावर बळाचा वापर करत वज्र वरुणसह मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.
परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इतवारी महाल गांधीबाग भागातील बाजारपेठा आज बंद राहणार आहे. तर महाल व काही भागातील तणाव स्थिती पाहता काही शाळांना आज सुटी देण्यात आली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून, हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, मोर्चा निघून गेल्यानंतर, काही युवकांनी चौकात एकत्र येऊन औरंगजेबाचे महिमामंडन करणाºया घोषणा देण्यास सुरुवात केली. त्या गोंधळात विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही चौकाकडे धाव घेतली. परिस्थिती तणावपूर्ण झाली.
मात्र, आंदोलन चिघळून काही अप्रिय घटनेची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. उपराजधानीच्या महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच स्थितीवर नियंत्रण मिळविल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कायम राहिली. दरम्यान, पोलिसांच्या बंदोबस्तात तातडीने वाढकरण्यात आली. समाजकंटकांना हुसकावून लावण्यात आल्यानंतर परिस- रात काही काळ तणावपूर्ण शांतता होती. कोणतीही अप्रिय घटनाटाळण्यासाठी सर्व समाजबांधवांनी शांतता राखावी, असे आवाहन करण्यात येत आहे.