भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर: शहरात स्वच्छते अभावी नाली, गटारांमध्ये घाणीचे थर साचत जातात व परिसरात दुगंर्धी, डासांचा प्रादुर्भाव होऊन साथरोग पसरण्याची भीती असते. परिणामी तुमसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले आता अॅक्शन मोड वर आले असून स्वत: जातीने उपस्थीत राहून शहरात डास नाशक औषधांची फवारणी व नाले सफाईचे चे काम करवून घेत आहेत. गत काही महिन्या अगोदर तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची धुरा जुम्मा प्यारेवाले यांनी सांभाळली.शहराला समजून घेताना अनेक अडचणी ने तोंड उघडले ते सांभाळत असताना शहराची स्वच्छते कडे काहीसा दुर्लक्ष झाला .
शहरातील अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर, तर कुठे नाली सफाई अभावी नाली गटारे तुंबलेल्या स्थितीत होते त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव शहरातवाढू लागला. डासांमुळे साथरोग पाडण्याची भीती लक्षात घेता पावसाळ्यापूर्वीच शहरातील प्रत्येक प्रभागात डास नाशक फवारणी औषध टाकण्याचे काम व नाले सफाईचे काम नगर परिषदेणे हातात घेतले असून त्यासाठी स्वत: मुख्याधिकाºयांनी कंबर कसली असून न प कार्यालयीन कामा नंतर ते चक्क काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून घेत आहेत. तर मूख्य रस्त्यावरून टिप्पर ने रेतीचे वाहतूक होताना रेती पडत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून रस्त्यावर पडलेली रेती उचलून मुख्य मार्गावर रोज सकाळ सायंकाळ पाणी सोडले जात आहे.