पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली; बँकांमध्ये शेतकºयांची गर्दी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मार्च महिना संपण्यास केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकºयांची लगबग वाढली असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये कर्ज भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी उसळत आहे. शेतीच्या खर्चासाठी शेतकºयाला सरकार मार्फत अगदी शून्य टक्के व्याजदराने कजार्चा पुरवठा केला जातो. मात्र त्यासाठी शेतकºयाने पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे.

पीक कजार्चा पैसा जवळपास नऊ महिने वापरता येत असल्याने पीक कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत कर्ज वितरण केले जाते. यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. खरिपातील धान नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यापासून शेतकरी भावाचा अंदाज बघून धानाचीविक्री करतात. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *