भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : कोविड संकटाच्या काळात जिल्ह्यात आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबरच योग, आयुष काढा आणि नैसर्गिक उपचार पद्धतीची गरज प्रकषार्ने जाणवली. पण केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयांमध्ये या उपचारांसाठी पुरेशी जागा नव्हती.ही अडचण लक्षात घेत, आ. विनोद अग्रवाल यांनी गोंदिया येथे आयुष्य रुग्णालय स्थापन करण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. याचीच दखल घेत शासनाने ५० खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर केले आहे. शहरातील टीबी टोली परिसरातील जुन्या टीबी हॉस्पिटलच्या जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीमुळे गोंदिया जिल्ह्यात आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडेल आणि नागरिकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबत आयुष पद्धतीचे उपचारही सहज उपलब्ध होतील.
गोंदिया येथे ५० खाटांचे आयुष्य रुग्णालय मंजूर…
