भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे गोरेगाव तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर, विकासवादी व प्रगतिशील ध्येय – धोरणांवर विश्वास ठेवून माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राचार्य योगेश्वर रुपचंद चौधरी, युवा उद्योगपती अमन चिंतामण चौधरी, आर टी ई फाऊंडेशन चे श्री. आर डी कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा वापरून प्रवेश केला. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केवल बघेले, कृष्णकुमार बिसेन, नानू मुदलियार, विशाल शेंडे, खुशाल कटरे, मनीष धमगाये, अनिता तुरकर, रामेश्वर हरिणखेडे, घनेश्वर तिराले, बाबा बोपचे, सोमेश्वर रहांगडाले, सुरेंद्र रहांगडाले सहित पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
गोरेगाव तालुक्यातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
