भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा संतापजनक प्रकार साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आला असून मुलीच्या आईच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करण्यात आली आहे. सौरभ उर्फ खलिराम मेश्राम वय १९ वर्ष रा. कनेरी/राम. तह. सडक अर्जुनी जि. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे. दि. १६ – १७ मार्चच्या मध्यरात्री आरोपी पिडीतेच्या घरी कुणी नसल्याचे पाहून अवैधरित्या घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला दूसºया दिवशी मुलीच्या आईला घटना माहिती होताच आईच्या तक्रारी वरून साकोली पोलीसात आरोपींविरुद्ध अपराध क्र. १४३/२५, ६४,२,(आय ), ६५ (१), ३३३ भारतीय न्याय संहिता ६४८ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले व त्यांची चमु करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
