भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कोका अभियारण्यात होत असलेल्या प्राणी हल्याच्या मुद्यावर आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे लावण्यात आलेल्या लक्षवेधी प्रश्नाला संपूर्ण महाराष्ट्राची समस्या अशी ग्राह्य धरून आज या वर बैठक आयोजित करण्यात अली. विधान भवन मुंबई येथे आयोजित बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी कोका अभियारण्या येथे चैन फेन्सिंग करीत २० कोटी चा निधी मंजूर केला. सोबतच वन्य प्राण्यांना पकडण्या करीत वणविभागास जिल्हा नियोजन मधून निधी देण्याचे निर्देश दिले. भंडारा लगतच्या कोका अभियारण्याच्या बाफर झोन मध्ये १९जानेवारी रोजी सरपण गोळा करवायस गेलेली महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. या घटणे संदर्भात आम. नरेंद्र भोंडेकर यांनी अधिवेशन दरम्यान लक्षवेधी प्रश्न लावले.
सोबतच अश्या घटना संपूर्ण महाराष्ट्रात हॉट असल्याचेनिदर्शनात येताच वन मंत्री गणेश नाईक यांनी या मुद्यावर आज संयुक्त बैठकीचे आयोजन केले. बाईहकी दरम्यान आम. भोंडेकर यांनी जिल्ह्यातील कोका अभियारण्य सह रावणवाडी येथील ही वन्यजीव हल्ले होत असल्याचे पटवून दिले. ज्यावर वन मंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील अभियारण्यात चैन फेन्सिंग करीत २०० कोटीची तरतूद करण्याचे आदेश दिले ज्यात २० कोटी चा निधी कोका अभियारण्या करीत मंजूर केले.
सोबतच रावणवडी वन क्षेत्रात लागत असलेल्या चैन फेन्सिंग चे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. याच बैठकीत भंडारा वन विभागाचे ळळउ चा प्रश्न मार्गी लावत वन मंत्री यांनी त्यास मान्यता दिली आहे आणि वन विभागाला लागत असलेल्या पिंजºयांचा निधी जिल्हा नियोजन मधून देण्यात यावे असे निर्देश संबंधित विभागस दिले. या बैठकीत आम. नरेंद्र भोंडेकर, आम. राजू कारेमोरे, आम. काशीनाथ दाते, आम. विकास ठाकरे, आम. आशीष देशमुख, आम. रंजनाताई जाधव, या. विजय राहांगडाले, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीमती शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव श्रीनिवास, उप सचिव विवेक होशिंग, मुख्य वणसंरक्षक मल्लिकार्जुन, भंडारा उप वनसंरक्षक राहुल गवई श सांभानधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.