भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महाष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना शाखा तिरोडाच्या वतीने अदानी पावर लिमीटेडचे कंत्राटी कामगारांचे २० मार्च २०२५ पासुन न्यायीक मागण्याकरिता आंदोलनांस प्रारंभ करण्यात आला. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांनी आंदोलनाच्या पुर्व संध्येला तिरोडा शाखाचे संघटना पदाधिकारी व कामगार बांधवांना उपोषण स्थळी भेट देण्यात आली. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांनी तिरोडा येथील हजारो कामगारांच्या अडी अडचणी प्रलंबीत असुन कामगारांना न्यायीक मागण्याकरिता आंदोलन करावे लागते ही फार मोठी शोकांतीका आहे.
शासनाचे प्रचलीत वेतन व मुलभुत सोई सुविधा तिरोडा येथील कामगारांना संबंधीत कंत्राटदार अदा करित नसल्याचे अदानी व्यवस्थापनांस विविध लेखी पत्राद्वारे संघटनेने कळविलेले आहे. अदानी व्यवस्थापन कामगारांचे शोषण व पिळवणुक करित असल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे. कामगारांना लेखी निवेदनातील मागण्या जोपर्यंत मीळणार नाहीत तोपर्यंत नियोजीत आंदोलन सुरुच रहाणार आहे असा रोखठोक सवाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांनी व्यक्त केला. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांनी उपोषण स्थळी भेट दिल्याने संघटना पदाधिकारी तमाम कामगार बांधवांना नवउर्जा व चेतन्य निर्माण होत असुन आंदोलन शांततामय आगार्ने करु व आपले हक्क अधिकार मीळवुन घेवु असा संदेश देण्यात आला.