मुरमाडी/ सा. गावात घाणीचे साम्राज्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील मुरमाडी/सा येथील वार्ड क्र.२ मध्ये वास्तव्य असणाºया नागरिकांत घाणीच्या साम्राज्यामुळे आक्रोश निर्माण झाला असून यासंबंधी ग्रामपंचायतीला अनेकदा निवेदन व पत्र देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखविल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची ग्रामपंचायत खेळ तर खेळत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुरमाडी/ सा येथील वार्ड क्र.२ मध्ये गायधने नामक व्यक्तीने गुराच्या गोठ्याचे बांधकाम सुरू केले असून त्यात शेणाची व मलमुत्राची दुगंर्धीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे नागरिकांच्या आरोग्याचे काळजी लक्षात घेता ग्रामपंचायतीने हस्तक्षेप करावे असे निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने हेतू परस्पर दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली. तक्रारीची दखल घेत खंडविकास अधिकारी यांनी गोठा बांधकामाची मजुरी सध्या थांबविली असून ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा असे पत्र दिल्याची माहिती आहे. तरीसुद्धा बांधकाम सुरू असल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायत लक्ष देत नाही यामुळे वास्तव्यास असलेल्या नागरिक व लाडक्या बहिणींनी पत्रकार परिषद घेत आपल्या व्यथा मांडल्या व होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडावी अशी विनंती पत्रकार परिषदेत केली या गोठा बांधकामामुळे ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याची खेळ खेळत असून गावात साथीच्या रोगाची लागण होऊ शकते अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे तेव्हा ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन नागरिकांचे हित जोपासले जावे अशी मागणी पत्रकार परिषदेत लाडक्या बहिणींनी केली आहे ग्रामपंचायतीने वैयक्तिक हिताला तिलांजली देत नागरिकांचे हित जोपासले पाहिजे असेही मत काही लाडक्या बहिणींनी पत्रकार परिषद व्यक्त केले पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य नंदलाल चौधरी वास्तव्यास असलेले नागरिक राघोर्ते, सावरकर आणि ३०-३५ लाडक्या बहिणी व नागरिक उपस्थित होते. अज्ञात वाहनाच्या

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *