राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता सीबीएसई अभ्यासक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यात जिल्हा परिषद शाळांसह इतर शासकीय शाळांमध्ये लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२५-२०२६ मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे. राज्यातीलविद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (२० मार्च) विधान परिषदेमध्ये दिली. भाजपचे नेते, आमदार प्रसाद लाड यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना याबद्दलचा प्रश्न विचारला होता. राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत राष्ट्रीय शिक्षण धोरणांनुसार केंद्रीय शिक्षण माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *