मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या शिवराम/टोला येथे मोहफुल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया राजोली सहवन क्षेत्राच्या शिवराम/टोला जंगलात आज रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. वन विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवराम/टोला गावातील अनुसया धानु कोल्हे वय ४५ वर्ष या गावातील इतर महिलांसोबत जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेल्या होत्या. मोहफुल वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला.

दरम्यान अन्य महिला पळून जाऊन बचावल्या मात्र संबंधित महिला वाघाच्या तावडीत सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ठार केल्यानंतर वाघाने तिला फरकटत जंगलात नेले या घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वाघ महिलेला ठार केल्यानंतर काही वेळापर्यंत मृतदेहाजवळ बसून राहिला. त्यानंतर काही वेळानी वन विभागाने महिलेचा मृतदेह घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे शिवराम/टोला गावात शोककळा पसरली असून गोठणगाव वनविभागाने नागरिकांना जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाकडून पीडित कुटुंबाला मदतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच परिसरात वाघाचा वावर लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात येत आहेत.

मध्यंतरी वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण ग्रामीण भागातील जनतेला सध्याच्या महफूल हंगामात पहाटेच्या सुमारास जंगल परिसरात जाण्यास मनाई करणारे आदेश केले होते. पण मोहफुल हे रात्रीच्या दरम्यान गळून पडतात त्यामुळे गावकरी महिला आणि पुरुष पहाटेच्या सुमारासच वेचणी करिता जातात. अशाप्रकारे आज नवेगावबांध जंगल परिसरातील शिवराम टोला येथे मोहफुल वेचण्याकरिता केलेल्या महिलेला वाघाच्या हल्ल्यात आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. या घटने नंतर तरीसुद्धा ग्रामीण परिसरातील महिला पुरुषांनी अगदी पहाटेच्या सुमारास मोहफुल वेचणी करिता जाण्यास टाळावे, असे आव्हान नवेगावबांध चे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप पवार यांनी जनतेला उद्देशून केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *