भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ३१ मार्च ही नुसती व्यापारी, उद्यमी,नोकरदार, बँकर यांचींच डेडलाइन आता राहिली नसून, भूमिपुत्र असलेल्या शेतकºयासाठी सुद्धा डेडलाइन झाल्याचे दिसून येते. निसगार्चा लहरीपणाचा,मानवाने प्रकृतीमध्ये केलेल्या छेडछाड चे परिणाम म्हणजे निसर्गचक्र बदलल्याने अवेळी पाऊस, चक्रीवादळे, गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ यासारख्या अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी सापडला असताना राज्यसरकार कडून वेळोवेळी मदत, बोनस च्या रूपात जाहीर करतांना सत्ता पक्षातील विविध नेत्यांकडून मोठमोठे बॅनर, वृत्तपत्रात जाहिरात देऊन केलेली जाहिरातीत मोठा फोटो म्हणजे मीच हे सर्व करून निधी मंजूर केल्याचा सोंग घेत असल्याचे सर्व जनतेला कळते. फटका मात्र शेतकºयांना बसतो, वेळेवर आणि पुरेशी मदत न मिळता, प्रशासनात सलगी असणारे विविध सत्ताधारी आपले वजन वापरून त्यांच्या परिवारातील नामधारी शेतकºयांना कसा जास्त फायदा मिळेल याची आखणी करतात, याचे उदाहरण सुकळी नकुल परिसरातील पूर पीडितांचे यादीला पाहिल्यास दिसून आले.
या व्यतिरिक्त जे धान शेतकºयांनी मेहनतीने सर्व संकटाचा सामना केल्यावर उरले ते उत्पादन शासकीय धान खरेदी केंद्रात विक्रीसाठी देऊन जानेवारी २०२५ उलटून गेला आल्यावरही जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी आजही हक्काचा धान विक्रीची रक्कम मिळविण्यासाठी सरकारकडे भीक मागताना दिसून येत आहे. एकीकडे शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकºयांना आम्हीच तुमचे मायबाप असल्याचे सांगावे. आणि दुसरीकडे त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी विनाकारण विलंब लावावे. हे कुठले न्याय. हे कुठले शेतकरी पोषक सरकार म्हणता येईल. तुमच्या हातात सत्ता आणि राज्याच्या कारभाराची किल्ली जरी असली तरी शेतकरी, मजूर, यांच्या जीवावर उठून सरकारे चालीत नसतात हे राजकर्त्यांनी समजले पाहिजे.
३१ मार्च नियमित कर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने वेळेवर कर्ज न भरल्याने बँकेची पत जाऊन दुबार कर्ज घेण्यासाठी शेतकºयांचा सिबील खराब होईल याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये. जे बोनस द्यायचे , जे धानाचे चुकारे द्यायचे ते ३१ मार्च पूर्वी म्हणजे २५ मार्च अगोदर शेतकºयांचे बँक खात्यात जमा करावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शासनाला केली आहे. खरं तर ही मागणी सत्ता पक्षातील लोकप्रतिनिधींनी करावयास हवी आहे. परंतु त्यांना जनतेच्या कामाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने जनतेची सेवा करण्याचे व्रत आम्ही घेतले असल्याने ते जरी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असले तरी मी मात्र जनतेशी असलेली नाळ, मला स्वस्थ बसू देत नाही. सरकारे सुद्धा जनकल्याणासाठीच आहेत. परंतु स्वाथापोर्टी त्यांना पडलेली भूल लक्षात आणण्याचे कार्य करणे हेही तितकेच खरे असल्याचे यावेळी चरण वाघमारे यांनी सांगितले.