भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरात मागील दोन ते तिन दिवसा पासुन सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन भंडारा तर्फे दिनांक २१ मार्च २०२५ रोजी सैय्यद सालार मस्जिद मेंढा, नुरी मस्जिद खाबंतलाव, बाबा मस्तानशहा मस्जिद पोस्ट आॅफिस चौक, शाही मस्जिद तकिया वार्ड, मदिना मस्जिद भंडारा, तकिया मस्जिद भंडारा सौदागर मस्जिद सौदागर मोहल्ला भंडारा, जामा मस्जिद काजीपुरा भंडारा, रजा मस्जिद बेला अशा एकुण ९ मस्जिद मध्ये जाऊन कॉर्नर बैठका घेऊन शांततेचे आवाहन करण्यात आले.
तसेच दिनांक २२ मार्च २०२५ रोजी भंडारा शहरातील बडा बाजार हनुमान मंदिर, बहिरंगेश्वर मंदिर खाम तलाव खात रोड भंडारा, भृशुंड गणेश मंदिर मेंढा तसेच दाट मिश्र वस्ती येथे कॉर्नर बैठका घेवुन आगामी सण उत्सवा मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही व कोणीही अशी पोस्ट करु नये जेणे करुन कोणत्याही धर्माच्या धार्मीक भावना दुखावल्या जाणार नाही याकरीता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन भंडारा पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी यांनी केले.