भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा: ३१ मार्च रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद सन शांततापूर्णरित्या पार पडावा तसेच तिरोडा शहराची असलेली हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा कायम राहात कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलीस स्टेशन तिरोडा येथून दिनांक २३ रोजी संध्याकाळी पोलीस निरीक्षक अमित वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे, मस- राम ,उप पोलीस निरीक्षक नस्टे, महिला पोलीस उपनिरीक्षक बैस,यांचे सह पोलीस कर्मचारी व शिघ्रकृती दलाचे जवानांनी पोलीस स्टेशन तिरोडा येथून रुट मार्च काढून शहरातील मुख्य रस्त्यातून फिरून पोलीस स्टेशन येथे परत आला.
ईद सणा निमित्त तिरोडा पोलिसांचा रूट मार्च
