बिबट्याने केल्या दहा कोंबड्या फस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरालगत असलेल्या मोना एग्रो इंडस्ट्रीजच्या बाजूला गुळ कारखाना येथील पोल्ट्री फार्म गोडाऊनमधे रात्रीला बिबट्याने शिरून दहा ते बारा कोंबड्या फस्त केल्या. याचे विडीयो सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या घटनेमुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार २१ मार्चच्या रात्री ०७:३० दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोना एग्रो इंडस्ट्रीबाजूला आयबी पोल्ट्री फार्मच्या एका मागील दारातून बिबट आत शिरला. व कुक्कुट गोडाऊन हॉलमधील तारेच्या बॉक्स कंपाऊंड वरून उडी घेत तेथे असलेल्या असंख्य कोंबड्यांवर त्याने झडप घातली. व तोंडात कोंबड्या कोंबून परत निघून गेला.

हा सगळा पाच ते सहा मिनीटाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त झाला. पण या स्थळावरून साकोली मुख्य शहर हे ५०० मीटर वरही नाही. आणि शहरालगतच ही घटना झाल्याने केव्हाही शहरात बिबट्या शिरून आता उन्हाळ्यात बाहेर निवांत झोपणाºया जनतेवर प्राणघातक हल्ला चढवू शकतो हे नाकारता येत नाही. तर वनविभागाने तत्परतेने याचा बंदोबस्त करून शहराजवळच वन्य परीसरात वास्तव्य असलेल्या बिबट्याला वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात सुखरूप सोडून देण्याची मुख्य शहर गणेश वार्ड, सिव्हिल वार्ड व तलाव वार्ड येथील जनतेने मागणी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *