भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर: तुमसर रोड देव्हाडी येथे शुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना आज दि.२३ मार्च रोजी उघडकीस आली आहे. अंकुश श्रीपत साठवणे रा. नेहरू नगर देव्हाडी वय ४० वर्ष असे मृत युवकाचे नाव असुन मृतक ग्रामपंचायत सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे. मुन्ना बिरणवारे वय अंदाजे ४० वर्ष असे आरोपीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार मृतक हा काही कामानिमित्त एक ते दीड महिन्यापासून बाहेरगावी गेला होता.
दोघांमध्ये काही कारणावरून जुना वाद होता आणि त्या वादातुनच आरोपीने मृतक अंकुश साठवणे याच्या घरी जावुन धारदार शस्त्राने त्याची हत्या केल्याची माहिती आहे. हत्येनंतर आरोपीने स्वत: तुमसर पोलीस स्टेशन गाठुन गुन्हा कबुल केल्याचीही माहिती आहे. पुढील तपास तुमसरचे पोलीस अधिकारी करीत आहे.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असुन नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसुन येत आहे.