भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुली आई-वडिलांची काळजी घेतात व आधार बनतात. मुलीचा जन्म नवीन जीवन नाही, तर तो मोठा आनंद आहे. मुलीच्या जन्माने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तोअभिमानाचा क्षण असतो. भविष्यात सक्षम व स्वावलंबी म्हणून समाजाला मदत करतात. त्यामुळे समाजाला नवीन दिशा मिळते, असे प्रतिपादन सरपंच लक्ष्मी लुटे यांनी केले. ग्राम संसद ग्रामपंचायत टांगा च्यावतीने कन्यारत्न झालेल्या मातांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी सरपंच लक्ष्मी लुटे बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती जगदीश शेंडे यांनी केले. मंचावर उपसरपंच ईश्वरदयाल बोंद्रे, ग्रामपंचायत सदस्य बेबी गिरीपुंजे, बबीता ईडपाते, गीता गिरीपुंजे, मनीषा गिरीपुंजे, देवदास गिरीपुंजे, ग्रामसचिव रजत हटवार यांची अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.
यावेळी रेश्मा सोनवणे,पुनम शेंडे या कन्यारत्न मातांचा २ हजार १०० प्रोत्साहनपर रोख रक्कम, शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थिततांनी मुलींच्या जन्माचे स्वागत केले. यावेळी मातांच्या चेहºयावर आनंद दिसून आला. यावेळी सभापती जगदीश शेंडे यांच्या हस्ते पाणी शुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. गावातील स्वच्छता अभियानात घेणाºया साठ स्वच्छता दूतांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच चालू वित्तीय वर्षात थकीत व चालू वषार्चे घरकर व पाणीपट्टी कर भरणाºया शंभर करदात्यांना सन्मानपत्र देण्यात आले.