क्षयरोग निर्मुलनासाठी सर्वांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन आरोग्य विभागातर्फे वर्ष २०२४ मध्ये पात्र झालेल्या ८२ ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचा क्षयमुक्त ग्राम पंचायत पारीतोषीक देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, यावेळी प्रमुख पाहुणे आनंद मलेवार सभापती आरोग्य व अर्थ समिती जि.प.भंडारा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दीपंचद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अमरदिप नंदेश्वर, डॉ. सुबोध थोटे तालुका आरोग्य अधिकारी, आयएमए चे अध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार, डॉ. हितेश तायडे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी उपस्थित सर्व सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना क्षयरोगाच्या निर्मुलनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हयातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत पुढील वर्षासाठी टीबीमुक्त पुरस्कारासाठी पात्र होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. अमरदिप नंदेश्वर यांनी केले. यावेळी प्रा. आ. केंद्र केसलवाडा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथिल अधिकारी व कर्मचारी यांचा सन २०२४ मध्ये क्षयरोग कार्यक्रमातील उत्कृष्ठ योगदानाबाबत सत्कार करण्यात आला. तसेच आयएमएचे अध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार यांचा ५० क्षयरुग्णांना पोषक आहार दिल्याबददल सत्कार करण्यात आला. तसेच १०० दिवसीय क्षयरोग मोहीमेतील निक्षय वाहनातील चालक मनिष सेलोकर, राठोड तसेच क्ष किरण तंत्रज्ञ गौतम भटकर व सुनिल भोंदे यांचा सत्कार करण्यात आला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *