गोंदिया : गोंदिया तालुक्यातील वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया रावणवाडी परिसरातील येणाºया माकडी येथील गणपत तुरकर यांच्या शेतशिवारात विचरण करीत असताना, एका निम्न व्यस्क सारस पक्षी चा ११ के.वी. विद्युत वाहिनी ला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना मिळताच वन विभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने त्या मृत सारस पक्षी ला पशुसंवर्धन विभाग कार्यालय गोंदिया येथे हलविण्यात आले. तिथं या मृत निम्न व्यस्क सारस पक्षी वर उत्तरीय तपासणी करण्यात आली. गोंदिया जिल्हा प्रशासनासह वन विभाग द्वारे गोंदिया जिल्ह्यात सारस संवर्धनाकरिता विविध प्रयत्न केले जात असताना सुद्धा विद्युत प्रवाहाच्या व्याख्याने तर कधी विषारी खाद्य पदार्थ यामुळे सारस चे मृत्यू होत असल्याचे गोंदिया जिल्ह्यात घडत आहे.
निम्न व्यस्क सारस पक्षी हा नर प्रजातीचा असून पाच महिने वयाचा होता. तो पूर्णपणे वनविभागाच्या अधिकाºयांच्या निगराणीत होता. त्याला दोन महिन्यापूर्वीच वन विभागाकडून टगिंग करण्यात आले होते. त्याच्या डाव्या पायात ०७७२५७ या क्रमांकाची रिंग टाकण्यात आली होती. हा मृत सारस आपल्या कुटुंबीया सह तीन च्या संख्येत माकडी येथील गणपत तुरकर यांच्या खाजगी शेत शिवारात विचरण करताना ग्रामस्थानी बघितले होते. पण आज पशुसंवर्धन विभाग कार्यालय गोंदिया या मृत सारस वर पशुसंवर्धन विभाग कार्यालय गोंदिया येथे शव विच्छेदन केल्यानंतर त्याला वनविभागाच्या कुडवा येथील बगीच्यात त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सारस पक्ष्याचे शरीराचे शवविच्छेदन तसेच अवयव जाळून नष्ट करण्याकरीता समिती गठीत करण्यात आली.