टायर फुटल्याने ट्रॉलीवरुन पडून मजूराचा मृत्यू

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : गट्टू भरुन गावाकडे येत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अचानक टारय फुटल्याने ट्रॉलीत बसलेला मजूर ट्रालीवरुन रोडावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता दरम्यान कारली ते आसलपाणी रस्त्यावर घडली. अमर देवनाथ कासवकर रा. गर्रा बघेडा असे मृतकाचे नाव आहे. दि. २५ मार्च रोजी मृतक अमर व ट्रॅक्टर चालक कन्हैया केकडे हे दोघेही ट्रॅक्टर मालकासाठी घराचे काम सुरु असल्याने गट्टू आणण्यासाठी टॅक्टर क्रमांक एमएच ३६ एजी ८७५१ ने येदरबुची येथे गेले होते. गट्टू भरुन बघेडाकडे येत असतांना कारली ते आसलपाणी या रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर फुटले. या ट्रॉलीमध्ये अमर कासवकर बसलेला होता. टाया फुटल्याने अमरचा तोल जावून तो रस्त्यावर पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरुन गोबरवाही पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरिक्षक भाष्कर भोंगाडे व पोलीस हवालदार खोब्रागडे हे करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *