थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे संचालक मैदानात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : – आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने थकलेल्या वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणच्या कर्मचा-यांसमवेत दस्तुरखुद्द महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादीकर हे देखिल मैदानात उतरले असून शुक्रवारी (दि. २९) त्यांनी नागपूर शहरातील लष्करीबाग, टेका नाका, नयी बस्ती, चार खंबा, महाल या भागात सुरु असलेल्या थकबाकी वसुली मोहीमेत भाग घेतला. ग्राहकांनी आपले नियमित वीजबिल थकबाकीसह भरण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने आक्रमक पवित्रा अवलंबित सर्वत्र थकबाकीदारा ग्राहकांकडे भेट देत वीज बिल भरण्यासाठि आग्रह करीत आहेत.

थकबाकी वसुलीच्या या कामात कर्मचा-यांना सदैव प्रशासन आपल्या सोबत आहे, ही भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादीकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे हे देखिल दिवसभर या मोहिमेतत्यांचे सोबत प्रत्यक्ष या मोहीमेत सहभागी झाले, यावेळी अरविंद भादीकर यांनी कर्मचा-यांसमवेत संवाद साधून थकबाकी वसुलीचा आढावा घेत मुख्यालयाने ठरवून दिलेले वसुलीचे उद्दीष्ट ३१ मार्च पर्यंत साध्य करण्याचे आवाहन केले. सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, लष्करीबाग उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहर मंडल, सिव्हील लाईन्स विभाग आणि लष्करीबाग उपविभागातील तांत्रिक, लेखा आणि मानव संसाधन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचा या मोहीमेत सहभाग होता.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *