राकॉं सभासद नोंदणीला माजी आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते शुभारंभ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते व शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणीची सुरुवात करण्यात आली. कार्यकर्ता मजबूत तर पार्टी मजबूत म्हणून पक्ष संघटनेत वाढ करण्यासाठी जास्तीत जास्त सभासदांची नोंदणी करणे गरजेचे आहे. आगामी काळातील निवडणूका अधिक मजबुतीने लढवायच्या असतील तर कार्यकर्ता पक्षाशी जोडणे आवश्यक आहे. खासदार प्रफुल पटेल यांचे शहराच्या विकासासाठी व प्रगतीसाठी खंबीर नेतृत्व आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकतें नाराज असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा त्यांच्या भेटी घ्या व पक्षाला मजबूत करण्याचे काम करा असे मार्गदर्शन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नानू मुदलियार, नागो बन्सोड, पुस्तकला माने, खुशाल कटरे, रेसराम साहू, कृष्ण कुमार टेम्भरे, मनोज कोहळे, राजू हाडगे, पप्पू वझा, श्रेयश खोब्रागडे, अमन घोडीचोर, दिवेश सतिसेवक, रिंकेश मेश्राम, ईशाख अन्सारी, भूषण पाटील, टिनू खंडारे, विशाल मेश्राम, मनीष काटेकर, सुमित ठाकरे, मोहित राऊत, जुनेद शेख, साहिल नागभीरे, संदेश उके, सन्नी चौरे, धन्नालाल आंबाडारे, हेमेंद्रनाथ माळवे, कविता माळवे, रामेश्वर कोहळे, माया कोहळे, राधिका कोहळे, गोपाल दखने, टंट्या पाचे, गणेश जामरे, प्यारेलाल तिवडे, चंद्रसेन मदनकर, राजू मेश्राम, धर्मराज गिरडकर, विनोद मानकर, दीप्ती ननांनी, कार्तिक राऊत, कार्तिका राऊत, ज्योती शहारे, भोजलाल हनवते, राजेश्वर चिंधालोरे, संगीता आंबेडारे, शिला मानकर, प्रभाकर दखने, फुलवंता बारसागडे, प्रमिला मेश्राम, शंकर फरकुंडे, रुपाली बिसेन, गीता चिंधारोले, करुणा जांभरे, अर्चना पटले, व्ही उमेश नरसिहराव, राज शेंडे, शिवम कांबळे, मोहमद अन्सारी, मोहित डोंगरे, मनीष मेश्राम, सुभाष चौरे सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन खुशाल कटरे तर आभार नागो बन्सोड यांनी केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *