भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी विद्युत निर्मिती प्रकल्पात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार २९ मार्च रोजी घडली.संजय यादव असे मृतक कामगाराचे नाव असून मृतक मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेन मधून कोळसा खाली करत असताना डोक्याला मार लागल्याने कामगार संजय यादव जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचाराकरिता नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण नागपूर येथील रुग्णालयात उच्चार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतक कामगार हा मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी होता. अदानी विद्युत निर्मिती प्रकल्पा समोर तेथील कंत्राटी कामगारांचा आंदोलन मागील एका आठवड्या पासून सुरू असल्याने अदानी मध्ये बाहेर राज्यातून मजूर आणून काम करवून घेतले जात आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील अदानी पावर प्लांटमध्ये कोळसा खाली करत असताना डोक्याला मार लागल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सध्या अदानी विद्युत निर्मिती प्रकल्पात पगारवाढीच्या मुद्द्याला घेऊन कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्याच्यामुळे अदानी मध्ये काम करण्यासाठी बाहेरून कामगार आणले आहे. अशातच शनिवारी काम करत असताना नवख्या कामगाराचा मृत्यू झाला. मृतक संजय यादव हा ट्रेन मधून कोळसा खाली करण्याचे काम करत होता. काम करत असताना त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले होते मात्र नागपूर येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.