भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- सन २०२२-०२३ जिल्हा वार्षिक योजनामध्ये अनुसुचित जाती महिला, प्राध्यापिका व विद्याथीर्नीना कौशल्य प्रशिक्षण जुडो कराटे व योगा अंतर्गत ८५ लक्ष खर्च करून ८५०० लाभाथीर्ना प्रशिक्षित करायचे योजिले होते मात्र तसे झाले नसुन यात फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण न देता बोगस एनजीओ ला काम देवून जिल्हयातील ८५०० दलित विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. म्हणजेच भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानत नाही. त्यांचा केवळ मतापुरताच उपयोग करून घेतात. ८५०० दलित विद्यार्थिनींना अंधारात ठेवण्याचा काम भाजपाने केला असल्याचा आरोप केशोरी चे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत ना. घाटबांधे यांनी शनिवार २९ मार्च रोजी शहीद काँग्रेस भोला भवन, गोंदिया येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबा बागडे उपस्थित होते. पुढे माहिती देताना श्रीकांत घाटबांधे म्हणाले की तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम व महिला व बालकल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी आपल्या मर्जीतील एनजीओ सोबत संगणमत करून ८६ लाख रुपयांची आपसात विल्हेवाट लावली आहे. तसेच गोंदिया जिल्हा परीषदेच्या सर्व शाळे मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास व्हावा म्हणून भारत देशाचे माजी पंतप्रधापन भारतरत्न अटलबिहारी बाजपेयीजी यांचे नावाने अटल किडा महोत्सव सुरू केले. तेव्हा जिल्हा परीषदेच्या सर्व सदस्यांने एकमताने अटल किडा महोत्सवाला मंजुरी प्रदान केली. परंतू अटलक्रिडा महोत्सवसाठी होणारा खर्च त्यासाठी डेकोरेशन किंवा ईतर साहित्य खरेदीसाठी निविदा काढलेली नाही. म्हणेजच भाजपा सत्तामध्ये असुन भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांना आदर्श मानतात. आणि त्यांचेच नावानेकुठलाही खर्च पारदर्शक न करून मलाई खान्याचा काम करतात.
अटल किडा महोत्सवाच्या नावाने लाखो रूपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. जिल्हा परीषदेमध्ये ग्रामिण क्षेत्रातुन आलेला लाभार्थी दिवसेदिवस जि.प.च्या फे-या मारत असतात, पण त्यांचे काम पुर्ण होत नाही. जिल्हा परीषद म्हणजे “झोलबा पाटलाचा वाडा “असे वाटु लागले आहे. म्हणजेच सत्ताधारांचा कोणत्याही अधिका-यावर नियंत्रण नाही. जिल्हा परीषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आपल्या मन-मजीर्ने वागतात. ग्रामिण क्षेत्रात अनेक समस्यांचा माहेर घर आहे. पिण्याच्या पाण्याची, विजेची, रस्त्यांची, जिल्हा परीषद शाळांचा, आरोग्य व्यवस्थेचा असे अनेक अनेक मुदयावर जिल्हा परीषद पदाधिकारी सत्ताधारी गांभीर्यात नाही. म्हणजे जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हाभर फीरून फीरूनसांगत असतात की जि.प.चांगला काम करून अडचणी दुर करीत आहे परंतू असे काहीही नसुन जि.प. गोंदिया ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ असल्याचे ही श्रीकांत घाटबांधे म्हणाले.