भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आमसभा सुरू असताना नऊ वेळा वीज गेली. आम्ही कामासाठी येतोय. काम करण्यासाठी बोजारा सुद्धा देतो. परंतु, अधिकारी व कर्मचाºयांच्या टेबलावरून फाईलच पुढे सरकत नाही असा गंभीर आरोप एका सरपंचांनी केला. यावेळी पालडोंगरी व टांगा येथील सरपंचांच्या समर्थकांनी डायससमोर प्रचंड गोंधळ घातला. आमसभा ६ वाजून २६ आमसभा संपली. बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका अपघातामुळे तशीच पडून आहे. नवीन रुग्णवहिका देण्याची मागणी करण्यात आली. काटेबाम्हणी गावाला ग्रामपंचायत इमारत नाही. स्मशानभूमी नाही असा चिंताजनक प्रश्न मांडण्यात आला. यशवंतराव चव्हाण घरकुल ७३ घरकुलाला मंजुरी पण निधी नाही.तसेच इतर घरकुल,५८ ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना १५ वित्त आयोगाचा निधीच आला नाही.वरठी ग्रामपंचायत मधील कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जातो. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्या असा प्रश्न तेथील सरपंचांनी उपस्थित केला.
आमसभेला जे विभाग प्रमुख अनुपस्थित होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसा अहवाल गटविकास अधिकाºयांना सभाध्यक्षांनी मागितला आहे. सभेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी दीपक हरीणखेडे यांनी केले. उपस्थित सरपंचांचे आभार आमदार राजू कारेमोरे यांनी केले. ९ सरपंचाकडून लेखी प्रश्न प्राप्त झाले. सरपंचांना आमसभेच्या आदल्या दिवसापर्यंत प्रश्न पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. केवळ नऊ ग्रामपंचायतच्या सरपंचांनी प्रश्न पाठवले होते. तसेच सर्वच १४ विभाग प्रमुखांनी अहवाल सादर केला. प्रथमच विभागनिहाय आमसभा घेण्यात आली.
मोहाडी तालुक्यात असलेल्या सात जिल्हा परिषद विभाग निहाय सभा पहिल्यांदाच आमसभा घेण्यात आली.आमदार व गट विकास अधिकारी काही काळ सभागृहाच्या बाहेर गेले होते.परंतु जोवर आमसभेचे अध्यक्ष सभागृहात येत नाही.तोवर आम्ही बोलणार नाही असे हिवराच्या सरपंच गौरीशँकर नागफासे यांनी भूमिका घेतली. काही वेळातच सभेचे अध्यक्ष आले. नंतर कांद्री विभागाच्या सभेला सुरुवात झाली. पंचायत समिती सदस्यांची दांडी दिसुन आली. पंचायत समितीची आमसभा सुरू झाली तेव्हा केवळ सातच पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर एक दोन पंचायत समिती सदस्य सभागृह सोडून निघून गेले. सात पंचायत समिती सदस्यांनी आमसभेला दांडी मारली होती. सामान्य लोकांचे काम करा. सामान्य लोकांचे काम झाले पाहिजेत. लोकांचे काम तात्काळ करा. कामाबद्दल नकारात्मक विचार करत बसू नका. विभागीय चौकशीला सामोरे जावे लागेल. नाहीतर अधिकाºयांच्या कार्यक्रम करावे लागेल असे आमदार राजू कारमोरे यांनी म्हटले. गोठ्यावरून भांडण झाले.महालगाव येथील एका लाभार्थ्याने गोठ्याच्या निधी मिळावा म्हणून गोंधळ घातला. परंतु त्या लाभार्थ्याने दिलेल्या कालावधीत काम केल्यामुळे त्याला अनुदान देता येणार नाही असे विभाग प्रमुखांनी सांगितले. तसेच रोजगार हमीचे काम झाले. मस्टर काढण्यात येऊ नये यासाठी महालगाव-मोरगावच्या पदाधिकाºयांनी गोंधळ घातला.
पाणी नेण्यावरून गोंधळ झाला. टांगा येथील स्मशानभूमीत पंधरा वर्षांपूर्वी हात पंप लावला होता. त्या हात पंपाला पाण्याच्या स्रोत अधिक आहे. विहिरगाव येथे बोअर मारण्यात आल्या परंतु या कोरड्या ठक्क पडल्या आहेत. टांगाच्या स्मशान भूमीच्या हातपंपावरून पाणी नेवू द्या,या कारणावरून टांगा व विहीरगाव येथील सरपंचांमध्ये प्रचंड वादावादी व गोंधळ झाला. तसेच वीज गेल्यामुळे सभेच्या कामकाज काही वेळ थांबला होता. माजी सभापती रितेश वासनिक यांनी वरठी ग्रामपंचायतची लोकसंख्या वाढ लक्षात घेता नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्यात यावे व्यासपिठावर आवाहन केले. यावर वरठी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये भविष्यात दहा पट निधी शासनाच्या वतीने उपलब्ध होत असल्याने आमसभेत सांगितले. सभेच्या यशस्वीतेसाठी के.बी.मारबते, सुरेश कटरे, सुधीर मेश्राम, माया मोटघरे यांनी परिश्रम केले. सुरक्षेच्या दृष्टीने मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुनिल हुकरे व होमगार्डच्या बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत आमसभा ठेवल्यामुळे गर्दी न होता सुरळीत पार पडल्याची अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये चर्चा आहे.