भंडारा : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्थानिक बसस्थानकाच्या परिसरात संस्कार भारती शाखा, भंडारा तर्फे ५० बाय ५० फूटाची रांगोळी नववर्षाच्या स्वागतासाठी साकारण्यात आली. याप्रसंगी डेपो मॅनेजर निमजे मॅडम, तसेच वाहतूक नियंत्रक पांढरकर यांच्या हस्ते नवोदित कलावंतांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी साकारली भव्य रांगोळी
