उन्हाळी धान पिकाला आता खोडकिड्याने घेरले!

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : दरवर्षी उत्तम पाऊस पडेल आणि आपण भरघोष पीक घेऊ अशी शेतकºयांची आशा असते. यावर्षी खरीप हंगामात निसर्गाने समाधानकारक पावसाची हजेरी लावल्याने शेतकरी कसाबसा आपल्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करून आपला उदरनिर्वाह चालवत आहे. सिंचनाची योग्य ती सोय नसल्याने निसर्गाला आपला देव मानून शेतकरी आपली अपेक्षा नेहमीच निसर्गावर सोडत असते. खरीप हंगाम समाधानकारक संपल्यानंतर आता शेतकरी शेतात उन्हाळी धान पिकाची फसल घेण्यास व्यस्त झाला आहे. एक महिन्या अगोदर शेतकºयाच्या शेतात उन्हाळी धन्याची रोवणी आटोपली आहेत. पण ह्या एक महिन्याच्या कालावधीत शेतकरी खोडकिडा या रोगापासून चांगलाच हैराण झाला आहे.

जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. धान्याच्या लागवडीला जेमतेम एक महिन्याच्या कालावधी झालेला आहे. मात्र दरवर्षी जसे हाल शेतकºयाचे होत असतात तसेच हाल यावर्षी सुद्धा होताना दिसत आहेत. यंदा धान पिकावर खोडकिडा या रोगाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी राजा चांगला चिंतेत पडला आहे. यावर्षीउन्हाळी धान पिकावर खोडकिड्याच्या खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयाचा हाती आलेले पीक वाया जाण्याची चिंता शेतकºयांना पडली आहे. खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशकाचे फवारणी करीत आहे. तरीसुद्धा खोडकिडा रोगावर नियंत्रण होताना दिसत नाही. त्यामुळे आत्तापासून शेतकरी राजा अजून किती रुपयाची औषधे फवारणी करणार? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *