भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : भामरागड तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात एका निरपराध वृद्धाची २९ मार्च रोजी मध्यरात्री नक्षल्यांनी एका निरपराध वृद्धाची गळा दाबून हत्या केली. ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या सकाळी ही घटना उजेडात आली. दोन महिन्यांत नक्षल्यांनी दोन हत्या केल्याने भामरागड हादरले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भामरागडच्या जुवी गावात हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव पुसू गिबा पुंगाटी (६०) आहे. ते शेती व्यवसाय करीत. कुटुंबासह ते २९ रोजी रात्री घरी होते. मध्यरात्रीच्या सुमारास चार नक्षलवाद्यांनी घराच्या दरवाजावर थाप मारली. कुटुंबियांनी दरवाजा उघडला असता पुसू यांच्याकडे काम आहे असे सांगून त्यांना ते सोबत घेऊन गेले. गावालगतच्या जंगलात पुसू पुंगाटी यांची गळा दाबून हत्या करण्यात आली.
भामरागडमध्ये नक्षल्यांचा थरार
