कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील केसलवाडा वाघ येथील ६५ वर्षीय शेतकºयाने कर्जबाजारीपणा व नापीकीला कंटाळून स्वत:च्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. ३०) ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नागेश घनश्याम वाघाये वय ६५ रा. केसलवाडा वाघ असे मृत शेतकºयाचे नाव असून शासनाकडून कर्जमाफी होईल या भोळ्या आशेवर त्याने कर्ज घेतले होते मात्र शासनाने कर्जमाफीची कोणतीही घोषणा न केल्यामुळे त्यांनी २ दिवसापूर्वी हात उसने करून सोसायटीचे कर्ज भरले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

शेतात गेल्या काही दिवसापासून वीज नसल्यामुळे उन्हाळी हंगामात लावलेले धान करपण्याच्या मार्गावर आहे तर धान पिकाला विविध रोगाने ग्रासले असल्याने हातउसने घेतलेले पैसे परत कसे करायचे या विवांचनेत राहून त्यांनी स्वत:च्या शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून उत्तरे परीक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नागेश यांच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात असून त्यांच्या पश्चात दोन भाऊ पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *