भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील वडेगाव येथील शेतकरी चत्रभुज युवराज ठाकरे हे आज दिनांक ३० रोजी आपले पत्नीसह सकाळी सात तीस दरम्यान शेतावर कामासाठी गेले असता त्यांचे घरासमोरील गोठ्याला अचानक आग लागल्याची माहिती नऊ तीस दरम्यान मिळाल्याने ते त्वरित आपले घराकडे धावले या दरम्यान गावकºयांनी अदानी प्रकल्प व नगरपरिषद तिरोडा येथे माहिती दिल्यावरून नगरपरिषद तिरोडा व अदानी प्रकल्पाचे अग्निशमन यंत्र येऊन आगीवर नियंत्रण मिळवले परंतु अग्निशमन दल येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोठ्यात ठेवलेले तनिस, धान, सायकल ,शेतीचे सामान, व लाकडी सेंट्रींग , गोठ्यातील लाकडे व टिना असा अंदाजे चार लक्ष रुपयाचा माल जळून खाक झाल्याचे शेतकरी चतुभुज ठाकरे यांनी सांगितले असून ही आग गोठ्यावरून गेलेले विजेचे तारांवर माकडे कूदल्याने विजेचे तारात स्पारकिंग होऊन ठीनगी तनसावर पडुन आग लागण्याची शक्यता वर्तवली जात असून नुकसान ग्रस्त शेतकºयाला शासनाने त्वरित शासकीय मदत द्यावी अशी मागणी तिरोडा पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण यांनी केली आहे.
गोठ्याला आग लागून शेतकºयाचे चार लक्ष रुपयाचे नुकसान
