भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील निलज बु येथील वैनगंगा वाळू घाटावर शासकीय वाळू घाट सुरू असून येथून मोठ्या प्रमाणावर वाळू मोठमोठ्या शहरात पाठवली जात आहे. मात्र, या वाळू वाहतुकीच्या आड सरकारी नियमांना धाब्यावर बसवण्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रकचालक वाहतूक पोलिसांची नजर चुकवण्यासाठी गाडीच्या नंबर प्लेट लपवण्याचा धक्कादायक प्रकार करत असल्याचे उघड झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,अनेक ट्रक चालक त्यांच्या नंबर प्लेट्स जाणीवपूर्वक काळ्या पेंटने झाकून ठेवतात. काही चालक तर नंबर प्लेट वरील विशिष्ट अंक मिटवून, ओळख पटू नये यासाठी वेगवेगळे क्लृप्त्या लावत आहेत. परिणामी, या ट्रकच्या हालचालींचे ठिकाण, वाहनचालकाची ओळख तसेच कोणत्याठिकाणी वाळूचा पुरवठा केला जात आहे, हे पोलिसांना समजणे कठीण बनले आहे.
ट्रकचालकांकडून क्रमांक लपवण्याचा धक्कादायक प्रकार उघड
