अनंतची आशियाई ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

भंडारा पत्रिकातालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील नेहरूवार्डतील रहिवासी व तुमसर येथील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयातील सेवानिवृत्त निमतानदार श्रीमती आशा अशोक बडवाईक यांचा नातू अनंत गौरीशंकर देशमुख वरठी यांची आशियाई ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. स्पर्धेचे आयोजन जॉर्डनमधील अम्मान शहरात होणार आहे. बॉक्सिंग हा जगातील सर्वात जुन्या लढाऊ खेळांपैकी एक आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू एकमेकांशी त्यांची इच्छाशक्ती, प्रतिक्षेप, सहनशक्ती, वेग आणि शक्ती वापरून लढतात. बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध हा प्राचीन काळापासून म्हणजेच ४००० वषार्पासून आफ्रिका या देशामध्ये खेळला जात होता आणि आताच्या काळामध्ये हा खेळ अमेरिका आणि युरोपमधील खूप लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे. बॉक्सिंग या खेळला पूर्वीच्या काळी पौग्लिझन या नावाने संबोधले जायचे.

सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक असे म्हणत होते कि हा खेळ खूप धोकादयक आहे कारण हा खेळ खेळताना खेळाडूला कोणतीतरी दुखापत होत होती त्यामुळे काही लोकांनी हा खेळ आॅलम्पिक मध्ये समाविष्ट करण्यावरून बंदी घातली होती. बॉक्सिंग या खेळला मराठीमध्ये ‘मुष्टीयुध्द’ म्हणतात. या खेळामध्ये २ खेळाडू एकमेका विरुद्ध खेळतात आणि आपण पहिले आहे कि बॉक्सिंग खेळणाºया खेळाडूंच्या हातामध्ये एक मजबूत १५० ते २५० ग्राम वजनाची मुठ घातलेली असते आणि त्याने ते प्रतिस्पर्ध्याशी लढत किंवा खेळत असतात. बॉक्सिंग हा खेळ उन्हाळी आॅलम्पिक खेळामध्ये समाविष्ट केला आहे. २०१२ पासून महिलांची आॅलम्पिक बॉक्सिंग खेळाची सुरुवात झाली आहे. बॉक्सिंग खेळाच्या मैदानाला बॉक्सिंग रिंग म्हणतात आणि हे मैदान चोरस आकाराचे असते. बॉक्सिंगच्या रिंग ह्या सामान्यता स्क्वेअरर्ड सर्कल म्हणून ओळखल्या जातात.

रिंगमध्ये एक उंच भाग असतो ज्यामध्ये प्रत्येक कोपºयावर असलेल्या खांबांना दोरीच्या सहाय्याने आतील बॉक्सिंगची भाग तयार केला जातो. बॉक्सिंगचा पृष्ठभाग हा साधारणपणे २५ मिमी च्या जाड पॅडींगच्या थराने व्यापलेला असतो. बॉक्सर लाल आणि निळ्या कोपºयात स्थित असतात. बॉक्सिंग हा एक खेळ आहे जो दोन खेळाडूंमध्ये ठराविक वेळेसाठी खेळला जातो. या खेळात खेळाडू एकमेकांना पंच मारून गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बॉक्सिंगचा इतिहास खूप जुना आहे. प्राचीन ग्रीसमध्ये बॉक्सिंगला महत्वाचे स्थान होते. १८ व्या शतकात आधुनिक बॉक्सिंग इंग्लंडमध्ये सुरू झाले.

नियम, बॉक्सिंग सामन्यात पंच आणि रेफरी असतात. रेफरी खेळाडूंचे नियम पालन करतात आणि त्यांची सुरक्षा जपतात.ठराविक राउंडनंतर, ज्या खेळाडूंचे गुण जास्त असतात, तो जिंकतो. नियम मोडल्यास खेळाडू बाद होऊशकतो. प्रकारव्यावसायिक बॉक्सिंग यात व्यावसायिक खेळाडू भाग घेतात. हौशी बॉक्सिंग यात शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरचे खेळाडू भाग घेतात. उपकरणे, हातमोजे, खेळाडूंच्या हातांचे संरक्षण करतात. तोंडाचे संरक्षक दात आणि जबड्याचे संरक्षण करतात. डोक्याचे संरक्षक, डोक्याला मार लागण्यापासून वाचवतात (केवळ हौशी बॉक्सिंगमध्ये भारत) बॉक्सिंग एक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मागणी करणारा खेळ आहे. यात चांगली शारीरिक क्षमता, चपळता आणि रणनीती आवश्यक असते.

नागपूर बॉक्सर्सची निवड १५ एप्रिलपासून जॉर्डनमधील अम्मान येथे होणाºया आशियाई ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व. ३० एप्रिलपासून हरियाणातील साई एनकोई, रोहतक येथे झालेल्या ज्युनियर बॉक्सिंग नॅशनल्सचे निकाल. दि.३ एप्रिल २०२५ रोजी भारतीय संघ निवडण्यासाठी ज्युनियर मुले नागपूरचा मास्टर अनंत देशमुख वय १७ वर्षांखालील वजन श्रेणी ६३ ते ६६ किलो. तिमाही फायनल दिल्लीच्या बॉक्सरविरुद्ध गुणांवर विजय, सेमी फायनल प्रयागराज (उत्तर प्रदेश) च्या बॉक्सरविरुद्ध गुणांवर विजय. उपांत्य लढतीत उत्तर प्रदेश आणि अंतिम लढतीत हरयाणाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली. एनआयएस प्रशिक्षक गणेश पुरोहित यांच्या मार्गदर्शनात विभागीय क्रीडा संकुलात सराव करतात. आपल्या यशाचे श्रेय आई आमिता गौरीशंकर देशमुख भिलगाव, भाऊ सारांश गौरीशंकर देशमुख यांना दिले आहे.

निवडीबद्दल निर्मला शँकर देशमुख तुमसर, सुनिता गजानन गायधने, रंजना एकानंद गायधने, सुषमा रमेश गायधने मोहाडी, रेखा विनोद माकडे भंडारा, आश्लेषा प्रकाश देशमुख सिहोर, विभ्ररा अर्चना झोडे मोहाडी, दीपिका संदीप मस्के भंडारा, मामा आदर्श अशोक बडवाईक, महेश विठ्ठल बारई, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे आदींनी अभिनंदन केले. जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या पदाधिकाºयांनी निवडीचे अभिनंदन केले असून, शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवी मंदिर कमेटी मोहाडी येथील सचिव गजानन ईसन गायधने यांचा युवा बॉक्सर अनंत देशमुख भाषा होय.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *