रेलटोली येथील मालधक्का शहराबाहेर हटवा – राजेंद्र जैन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (डीआरएम) डी.बी.गुप्ता हे शनिवारी (दि.५) गोंदिया जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. अमृत भारत स्टेशन योजनेत गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. याअंतर्गत रेल्वे स्थानकाचे आधुनिकरण केले जात आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी माजी आ.राजेंद्र जैन यांनी त्यांची भेट घेवून शहरातील रेलटोली परिसरातील मालधक्का शहराबाहेर हटविण्याची मागणी केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन देत त्यांचे समस्यांकडे लक्ष वेधले. रेलटोली परिसरातील रेल्वे मालधक्क्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. तर याच मार्गावर शाळा महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा याचा फटका बसतो. यामुळे अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे या मालधक्क्याचे शहराबाहेर स्थानांतरण करण्यात यावे अशी मागणी शिक्षण संस्था आणि रामनगर पोलिसांनी सुध्दा केली आहे.

गोंदिया रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराकडे जाणारा मार्ग अरुंद फारच अरुंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे गुजराती समाजवाडी, रेल्वे विश्रामगृह मार्गावरील भिंत फोडून रस्ता तयार करण्यात यावा. याचे अनेकदा सर्वेक्षण करण्यात आले मात्रअद्यापही हा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही. याकडे सुध्दा माजी आ.जैन यांनी डीआरम गुप्ता यांचे लक्ष वेधले. रेल्वे तलावाचे सौंदर्यीकरण, नागपूर-बिलासपूर मार्गावरील तिरोडा रेल्वे स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, स्वयंचलित वाहन, फलाटावर डिस्प्ले बोर्ड, पार्किंग झोन व फलाट क्रमांक २ वर उपहारागृहाची व्यवस्था करण्याची मागणी केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *