भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तामसवाडीत जलजीवन मिशन हर घर नल योजनेत ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले. वर्षभरापासून जलकुंभात पाणीच आले नाही. वैनगंगा नदीकाठावर गाव असताना गावकरी तहानलेलेच आहेत. जलजीवन मिशनच्या कामात मोठी अनियमितता झाली असल्याने अन्य गावांतही या योजनेवर ताशेरे ओढले जात आहेत. योजनेचे काम १ मार्च २०२३ ला सुरू करण्यात आले. योजनेवर ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात विंधन विहीर बांधकामात ८४ हजार रुपये खर्च दाखविण्यात आले आहे. ट्यूबवेलच्या कामात २ लाख २३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असला, तरी गावकºयांना पाणी मिळाले नाही. पम्पिंग मशिनरी १ लाख ३८ हजार आणि पंपगृहच्या निर्मितीसाठी २ लाख ५८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
याशिवाय उर्ध्व नलिका १४ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी वितरण नलिका देण्यात आलेल्या आहेत. यात सर्वाधिक ३९ लाख १७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गावात अभिनव टाकी उभी आहे. ही योजना बंद झाली असल्याने गावात अशा टाकी उभ्या आहेत. याच टाकीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. या कामात ३ लाख ४७ हजार रुपयांची उचल करण्यात आली आहे. गावात नवीन टाकी जलकुंभ नव्याने बांधकाम करण्याची जुनी ओरड असताना कंत्राटदार आणि अधिकाºयांनी ऐकले नाही. नळजोडणीच्या कामात ६ लाख ६८ हजार, तर योजना चालविण्यासाठी ७८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु योजनेच्या यशस्वीतेसंबंधाने व्यापक उपाययोजना झालेल्या नसल्यानेअनेक प्रश्न उपस्थित होत आहे.