भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : कोणतीही व्यक्ती घरावाचून वंचित राहू नये, या व्यापक भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या १००दिवसीय कृती कार्यक्रम अंतर्गत आज नागपुरातील एकूण ५७८ लोकांच्या मालकी हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती झाली. यातील प्रातिनिधिक लाभधारकांना नझुल जमिनीचे मालकी हक्क भोगवटा प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहाल करण्यात आले. प्रत्येकाच्या घरांची स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी प्रधानमंत्री योजना, रमाई घरकुल योजना, सर्वांसाठी घरे, अभय योजना साका- रली. याला जोड देत शासनाच्या १०० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरात निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्त्वावर दिलेल्या नझुल जमिनीचे मालकी हक्कभोगवटा धारकांना देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते.
या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी नागपूर शहरात विविध ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने शिबिरे घेतली. यात एकूण ५७८ प्राप्त झाले. त्यांच्या मंजुरीमुळे ६० ते ७० वर्षांपासून निवास असलेल्या भूखंडधारकांना त्यांचा मालकी हक्के प्राप्त झाला.ह्यसवार्साठी घरेह्ण अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागातील नझुल जमिनीवर अतिक्रमण करून रहिवास करणाड्ढया अधिसूचित झोपडपट्टीमधील गरजू व लाभार्थी नागरिकांना आवास योजनेंतर्गत जमिनीचे अतिक्रमण नियमानुकूल करून शासनाच्या १०० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत नझुल विभागाकडून पट्टे देण्याचे काम सुरू आहे.त्यापैकी मौजा सीताबर्डीच्या मरियमनगरातील गरजू व लाभार्थी नागरिकांचे पट्टे तयार करण्यात आले आहेत. तेथील लोकांना प्रातिनिधिक पट्टे वाटप वाटपवेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी बगळे, संजय बंगाले, सुनील हिरणवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनार्ते ई-नझूल आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या माध्यमातून या कामाला गती देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.अभय योजनेंतर्गत भोगवटादार वर्ग-1 चे बन्सीलाल नारंग, मंजू अशोक परशरामपुरीया व इतर, साई अंकुर अपार्टमेंटर्ते रुचिर कुमार अग्रवाल व इतर, द्वारकामाई अपार्टमेंटर्ते गाळेधारक बिनोबेन पटेल, प्रशांत सुरेश बखले व इतर, सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत पट्टे धारक मॉरिस आरिकस्वामी मायकल व कारमेल मॉरिस मायकल,रोजखान मुनीरखान व अफ साना फिरोजखान, पुष्पा विश्वंभरनाथ शाहु, रंजित छोटेलाल गौरे यांना वाटप करण्यात आले.