पंडकेपार टोली येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी जयंती उत्साहात साजरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील मौजा पिंडकेपार टोली येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ पिंडकेपार टोली यांच्या वतीने मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सुमारास रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सामूहिक हवन कार्य, महाप्रसाद कार्यक्रम पार पडले. व रात्रीच्या सुमारास महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जीवन चरित्रावर संगीतमय भजन गायनाचे कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष जनसेवक पवन मस्के हे होते. यावेळी जनसेवक पवन मस्के यांनी उपस्थित युवक महिला व सर्व उपस्थितांना महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी केलेल्या कार्याची जाणीव करून दिली.

बाबा जुमदेवजी यांनी घडविलेल्या समाजाबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत असेही यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवक पवन मस्के, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, रुपेश आतीलकर सुशील दिवटे, प्रशांत रामटेके , राजू बाभरे, माधुरी दिवटे, सोनिया दिवटे, स्मिता बडवाईक, सुनिता बोंद्रे, रक्षा मडामे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, परमात्मा एक सेवक मंडळाचे जेष्ठ सेवक सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परमात्मा एक सेवक मंडळ पिंडकेपार येथील नितीन कहालकर, रोहित तांबुलकर, दिगंबर मेश्राम, वैद्य, व युवक मंडळींनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सहकार्य केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *