भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त साकोली शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला चौकाचौकात भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. महिला, पुरुष, युवक, लहानग्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संपूर्ण शहर भगवामय झाले. या शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण ठरले “नागा साधू अघोरी कला”. भक्तांनी या देखाव्याला प्रचंड प्रतिसाद दिला.
याशिवाय, श्रीराम हिंदू युवा मंच तर्फे तयार करण्यात आलेली ‘श्रीकेदारनाथ मंदिर’ ची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी दुपारपासूनच गर्दी उसळली होती.रामनवमी शोभायात्रा समितीचे संयोजक राजूभाऊ दुबे तसेच समितीचे सदस्य सर्वश्री सागर पुस्तोळे , गजेंद्र कोसलकर राजेश कापगते,आशिष गुप्ता, प्रणित नशिने, महिपाल राजपुरोहित, रवी अग्रवाल, अमोल हलमारे, मनीष कापगते, मेसर्स कोणार्क, अरुण गुप्ता, पप्पू गुप्ता, अनुपम गुप्ता, संदीप गुप्ता, उत्तम गोडसेलवार डॉक्टर राजेश चंदवानी, विजू दुबे, नयन पटेल, तरुण मल्लानी, निखिल तनवाणी, दर्शन उंबरे, आदित्य गुप्ता, अखिल गुप्ता, समाधान ट्रेडर्स, प्रशांतजी गुप्ता, अनिल गुप्ता, वर्मा ट्रॅक्टर, डॉक्टर नितीन गुप्ता, मोदी पेट्रोल पंप, जनार्दन गजापुरे, अमर चुघ ,प्रखर गुप्ता, प्रसन्न गुप्ता, डाकराम कापगते, भगवान पटले, किशोर पोगले,रवी परशुरामकर, प्रवीण भाई पटेल, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, डॉक्टर सुनील चतुवेर्दी, कृष्णा अग्रवाल, राजेश बैस,संतोष कोरे, शैलेश वाधडिया, रोहित मल्लानी, किशोर मोहबे, राहुल आगलावे, हेमंत बल्लाळ, प्रशांत डोंबळे, आशिष भुते, नंदू गहाणे, पद्माकर बोरकर, हेम कृष्ण मुंगुलमारे, विवेक भाजीपाले, मोहन चांदेवार, हर्षल कापगते, नचिकेत कुलकर्णी, सदूभाऊ कापगते एडवोकेट बापूसाहेब अवचटे, होमेश गहाणे, व मोठा जनसमुदाय उपस्थित होता सर्व वयोगटातील नागरिकांनी या देखाव्याचा आनंद घेतला. शोभायात्रेनंतर न्यायालय चौकात आयोजित भव्य भोजन महाप्रसादाचा हजारो श्रीराम भक्तांनी लाभ घेतला.
गरमागरम प्रसादाचे वितरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम नवमी शोभायात्रा समिती साकोली सेंदूरवाफा यांच्या वतीने करण्यात आले होते. या शोभायात्रेत आमदार नाना पटोले यांनीही आवर्जून हजेरी लावून आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण, पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, सहा. पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे, तसेच पोलीसउपनिरीक्षक प्रशांत वडुले, मित्तरवार सर आणि त्यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, वाहतूक विभाग व होमगार्ड पथकांनी शांतता आणि सुव्यवस्थेचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले. महामार्गावर सुद्धा साकोली पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे वाहतूक सुरळीतपणे पार पडली. संपूर्ण शहरात धर्म, श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव पाहायला मिळाला. श्रीराम नवमीचा उत्सव हा भाविकांसाठी एक अविस्मरणीय पर्व ठरला.