भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : श्रीराम नवमी निमित्त तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात श्रीराम जन्मोत्सवा नंतर भव्य बाईक रॅली व संध्याकाळी निघालेले शोभायात्रेत विविध देखाव्यांसह प्रयागराज येथील कुंभमेळ्याचे देखाव्यांनी नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते. सहा एप्रिल रोजी दर वर्षाप्रमाणे श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समितीतर्फे श्रीराम गजानन मंदिर स्टेशन मार्ग तिरोडा येथे दुपारी श्री राम जन्मोत्सव सोहळा आटोपल्यानंतर जय श्रीराम च्या घोषणा देत श्रीराम नवमी युवा समितीद्वारे भव्य बाईक रॅली काढून नगर भ्रमण करून श्रीराम गजानन मंदिरात परत येऊन संध्याकाळी निघालेल्या शोभायात्रेत आकर्षक डी.जे सह ढोल ताशांचा दुय्यम मुकाबला ,आकर्षक सजीव व चीत्ररथ देखाव्यासह नुकताच प्रयागराज येथे संपन्न झालेले
कुंभमेळ्यातील विविध साधूंचे आकर्षक नृत्य व देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते या शोभायात्रे निमित्त शोभा यात्रेतील मार्गावर अनेक जागी आकर्षक स्वागत कमानी उभारून तर काही जागी एलईडी भिंती उभारून श्रीरामाचे जीवन चरित्र व लेझर शो दाखवण्यात येत होते ही शोभायात्रा श्रीराम गजानन मंदिर येथून निघून सपना फॅशन ,कहार मोहल्ला, जुनी वस्ती, गुरुदेव चौक, मोहनलाल कंपनी, डॉक्टर आंबेडकर वाचनालय, पोलीस स्टेशन ,कृषी उत्पन्न बाजार समिती , खैरलांजी मार्ग,रानी अवंतीबाई पुतळा मार्गे श्रीराम गजानन मंदिरात परत आली या यात्रेचे मार्गावर अनेक सामाजिक संस्था, व्यापारी संघटना व नागरिकांतर्फे शोभायात्रेतील भाविक भक्तांकर्ता अल्पोपहार व शितल पेयाची व्यवस्था केली होती या अल्पोपहार व शीतल पेय वाटपात हिंदू बांधवांसह काही जागी मुस्लिम बांधवही भाविक भक्तांना अल्पोपहार व शीतल पेय वाटपात मदत करत असल्याचे दिसून पाहायला आले. श्री राम शोभा यात्रेस वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्था राहावी म्हणून तिरोडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.