भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आंधळगाव पोलीस हद्दीतील अवैध धंदे चालकांची मुजोरी वाढतच चालली असून नूतन पोलीस अधीक्षकांच्या काळात ती चांगलीच फोफावली आहे. गल्लोगल्ली अवैध धंदे सुरू असून पोलीस ठाण्यापासून तर सीमेपर्यंत शेकडो अवैध धंदे सुरू आहे. अनेकदा अवैध धंदे करणाºयाकडून गावागावात वाद होतात दिसत आहे. सालई खुर्द, उसर्रा, आंबागड, रामपूर आदी गावात राजरोसपणे अवैद्य धंदे जोरात सुरू असून, बोकाळलेला अवैध धंद्याला लगाम कोण घालणार? पोलीस अधीक्षक म्हणून नुरुल हसन यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी अवैध धंदे, अंतर्गत राजकारण आणि इतर कारणांमुळे पोलीस कर्मचारी वसुली अभियानात मग्न असून पोलीस कर्मचारी कोणत्याही चौकशीला किंवा कारवाईला सामोरे जाताना दिसत नाही.
आंधळगाव ठाण्यातील एका पोलीस कर्मचारी यांचा मूळचा व्यवसाय रेती चोरीचा असल्याचे गावात चर्चा सुरू आहे. सालई खुर्द बिटचे जमादार व पो.शी.यांच्या आशिर्वादाने आंबागड येथे अवैध जनावरांची उलाढाल करून अवैध धंद्याला मोठ्या प्रमाणात पाठबळ देत असूनही वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. याकडे आंधळगावचे ठाणेदार यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोपणे हे अवैध धंदे करणाºयाच्या पाठ- ीशी खंबीरपणे उभे तर नाही ना? अशी शंका सर्वसामान्य माणसाला सतावत आहे. तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरून कत्तलखाण्यात जनावरे वाहतूक करणाºया वाहन चालकाकडून आंधळगाव पोलीस खुलेआम अवैध वसुली करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. दररोज या महामार्गावरून अनेक ट्रक, बोलेरो पिकअप, कंटेनर, टाटा एस पिकअप इत्यादी वाहनातून वाहतूक होत असते.
प्राणी संरक्षणाकरिता शासनाने अनेक कठोर कायदे केले असले तरी कत्तलखाण्यात जाणाºया जनावरांची संख्या कमी होताना दिसत नाही. राष्ट्रीय महामार्गाने दररोज जनावरांची वाहतूक कोंडी अनेक महिन्यापासून सुरू आहे. तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना नियमबाह्य अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची कल्पना कशी नाही? की प्रशासनाच्या संरक्षणात सदर गोरखधंदा सुरू आहे. हे कळण्यास मार्ग नाही. जनावरे वाहतूक करणाºया वाहन चालकांकडून आंधळगाव पोलीस ठाण्यातील त्या हिरा कडून अवैध वसुली जोरात. अधिकारीकर्मचारी,गोरक्षक की कोण? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सालई खुर्द बिट परिसरातील अवैध धंद्यांना या भागातील बिट जमादार व पोलीस शिपाई पोलिसांचेच पाठबळ आहे. आंबागड येथे दोन रेतीचे ट्रॅक्टर बिट जमादार व पो.शिपाई यांनी पकडलेआणि वीस हजार रुपयांची मांडवली करून दोन्ही ट्रॅक्टर सोडण्यात आले. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.