भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील आणि गोंदिया शहरा जवळील रतनारानवेगाव येथील एक प्रकरण सध्या गोंदिया जिल्ह्यात सुरु आहे. स्वत:ला प्रसिद्ध करण्यासाठी तरुण मंडळी अगदी जीव घेणे स्टंट करताना दिसतात आणि ते जाणून समाज माध्यमावर चित्रफिती प्रसारित करतात. पण अशा स्टंटबाजी मुळे केवळ स्वत:च्या जीवालाच नाही तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. कदाचित एखाद्या प्रवाशांनी भरलेल्या बस किंवा इतर वाहनासोबत अशा स्टंटबाजीमुळे अपघात झाल्यास दोष कुणाला द्यावा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अशीच एक अत्यंत धोकादायक चित्रफिती गोंदिया जिल्ह्यातील आहे जी समाज माध्यमावर ही चित्रफिती वेगाने प्रसा-ि रत होत आहे. त्या चित्रफिती मध्ये एक तरुण आपले दोन्ही हात सोडून रस्त्यावर भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसत आहे.
स्वत:च्या जीवा सोबतच तो इतरां चा ही जीव धोक्यात घालत असल्याचे या चित्रफिती मध्ये दिसत आहे. या प्रसारित झालेल्या चित्रफिती ची गोंदिया पोलीस/ वाहतूक पोलिस दखल घेणार का ? असा प्रश्नही आता नागरिक विचारत आहेत. रतनारा-नवेगाव रस्त्यावर एक तरुण नंबर नसलेल्या मोटार सायकलवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे.
गुरूवार १० एप्रिल २०२५ रोजी गोंदियाच्या मुख्य व्हाट्सअप ग्रुप ह्लगोंदिया विधानसभाह्व या ग्रुप च्या समाज माध्यमावर चित्रफिती प्रसारित झाली आहे. प्रसारित चित्रफिती मध्ये दिसत आहे की, हा तरुण दोन्ही हात सोडून भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत आहे आणि त्याच वेळी समोरून एक टिप्पर येत आहे, तरीही तो तरुण उभाराहून पुढे जाताना दिसत आहे. या काळात तरुणाचे मोटार सायकलवरील नियंत्रण सुटले असते तर मोठा अपघात टाळता आला नसता. ही चित्रफिती समाज माध्यमावर प्रसारित होताच, ‘गोंदिया विधानसभा ‘ व्हॉट्स अॅप ग्रूपच्या सक्रिय सदस्यांनी आपापल्या प्रतिक्रिया लिहून पोलिसांना दखल घेण्यास सांगितले.
‘गोंदिया विधानसभा’ व्हॉट्स अॅप ग्रूप मध्ये लोकप्रतिनिधीं व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत. त्यामुळे त्या प्रसारित चित्रफितीची जिल्हा पोलीस दखल घेणार का? हा प्रकार समाज माध्यमावरही उपस्थित होत आहे.